रत्नागिरी – येथील जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आंबा वाहतुकीला अनुमती दिली आहे. आंबा वाहतुकीसाठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून १ आठवड्याकरता ‘पास’ मिळणार आहे. यासाठी आंबा वाहतूक करणार्यांनी प्रशासनाकडे अर्ज केल्यावर आंबा वाहतुकीसाठी ‘डिजिटल’ अनुमती मिळणार आहे. अर्ज करतांना गाडीचा नंबर, कुठून कुठे जाणार ? ड्रायव्हरचे नाव, लायसेन्स आदी माहिती अर्जामध्ये भरायची आहे. अडचण आल्यास संबंधित जिल्हा अधीक्षक रत्नागिरी अधीकारी घोरपडे, तालुका अधिकारी विनोद हेगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.