(सी.ई.टी. म्हणजे कॉमन इंटरन्स टेस्ट – सामायिक प्रवेश परीक्षा)

शिवमोगा (कर्नाटक) – शिवमोगा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी येथील आदिचुंचनगिरी महाविद्यालयामधील सी.ई.टी. परीक्षा देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण विद्यार्थ्याचे जानवे काढल्याच्या प्रकारावरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेविषयी ब्राह्मण महासभेने आणि विप्र संघटनांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर अधिकार्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकार्याला त्वरित निलंबित करण्याचे निर्देश मंत्री मधु बंगारप्पा यांनी शिवमोगाच्या जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
🚨Two officials suspended for removing a student’s janeu (sacred thread) before the Karnataka CET exam.
Question being raised: Would any official dare remove a Muslim student’s prayer cap?#CETExamControversy
PC: @IndiaToday https://t.co/bxrXH1rcy6 pic.twitter.com/1hsqtcOi6Y— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2025
संपादकीय भूमिकाएखाद्या मुसलमान विद्यार्थ्याच्या डोक्यावरील गोल जाळीदार टोपी काढण्याचे धाडस अधिकार्याने दाखवले असते का ? |