जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांजणगाव (ता. शिरुर, जिल्हा पुणे) येथे ५ जणांवर गुन्हा नोंद

नागरिकांनो, जमावबंदीच्या आदेशाचे शतप्रतिशत पालन करा ! शासकीय सूचनांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.

पुणे – जमावबंदीचा आदेश असतांनाही रांजणगाव येथील राजमुद्रा चौकात घोळका करून विनाकारण उभे असलेल्या ५ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनंत घोडे, शरद घोडे, रामचंद्र पर्‍हाड, माधव कवडे आणि गणेश शेवाळे अशी आरोपींची नावे आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी संबंधितांना ‘तुम्ही येथे थांबू नका’, असे आवाहन करूनही त्यांनी ते न ऐकल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.