औषध विक्रेत्यांनी ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ यांची साठेबाजी करू नये
सोलापूर, २६ मार्च (वार्ता.) – येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयाने उत्पादकाचे नाव अन् परवाना क्रमांक नमूद नसलेल्या ‘सॅनिटायझर’च्या १०० बाटल्या जप्त केल्या आहेत. कोठारी सेल्स कार्पोरेशन, मंगळवार पेठ, सोलापूर येथे पडताळणी केली असता नाकोडा आस्थापनाचे ‘हँड सॅनिटायझर’ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले; मात्र बाटलीवर उत्पादकाचे नाव, परवाना क्रमांक नमूद नसल्याने १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या बाटल्यांची किंमत ९ सहस्र ५०० रुपये आहे. (अशा उत्पादकांवर तात्काळ कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)
औषध विक्रेत्यांनी ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ यांची साठेबाजी करणे, अधिक दराने त्यांची विक्री करणे असे प्रकार करू नयेत. तसे केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त भु.पो. पाटील यांनी सांगितले आहे. आतापर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने ६८ औषध दुकानांच्या याविषयी पडताळण्या करण्यात आल्या आहेत.