१. विविध चक्रांवर नामपट्ट्या लावणे
‘नामपट्टी शरिराला स्पर्श करून लावतांना नामपट्टीचा अक्षरे असलेला भाग बाहेरच्या दिशेने (निर्गुण) ठेवायचा कि आतल्या दिशेने (सगुण) ठेवायचा ?’, हे येथे दिले आहे.
टीप १ – ‘पुढे’ म्हणजे शरिराचा चक्राशी संबंधित पुढचा भाग
टीप २ – ‘पाठी’ म्हणजे शरिराचा चक्राशी संबंधित पाठचा भाग
टीप ३ – सहस्रारचक्राशी संबंधित डोक्याच्या वर मध्यभागी एकच स्थान असते. तेथे नामपट्टी लावावी.
२. जप
सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. कालमाहात्म्यानुसार सर्वसाधारणपणे सध्या साधकांना होणार्या त्रासांपैकी ७० टक्के त्रास समष्टी स्तरावरील, तर ३० टक्के त्रास व्यष्टी स्तरावरील आहेत.
२ अ. उपाय म्हणून बसून जप करणारे साधक : यांनी जेवढा वेळ नामजप करणार, त्याच्या ७० टक्के वेळ व्यष्टी उपायांसाठीचा ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार शोधून मिळालेला जप, सांगितलेला अन्य काही जप किंवा मंत्रजप असल्यास ते करावेत, तर ३० टक्के वेळ ‘निर्गुण’ हा नामजप समष्टीसाठी करावा.
शोधलेल्या उपायांचा २ – ३ आठवड्यांत लाभ न झाल्यास किंवा तीव्र त्रास असल्यामुळे उपाय शोधता येत नसल्यास ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या साधकांना किंवा संतांना विचारावे.
२ आ. उपाय म्हणून बसून जप न करणारे साधक : यांनी दिवसभरातील संपूर्ण वेळ ‘निर्गुण’ हा नामजप करावा. त्यांना जर काही त्रास होत असेल, तर त्यांनी त्रासाच्या तीव्रतेनुसार (टीप) तेवढ्या कालावधीसाठी उपायांसाठीचा जप बसून करावा आणि उर्वरित वेळ ‘निर्गुण’ हा नामजप करावा.
टीप – मंद त्रास असल्यास १ ते २ घंटे, मध्यम त्रास असल्यास ३ ते ४ घंटे आणि तीव्र त्रास असल्यास ५ ते ६ घंटे उपाय करावेत.
२ इ. समष्टीसाठी नामजप करणारे संत आणि साधक : काही संत समष्टीसाठी काही घंटे नामजप करतात, तसेच ६० टक्क्यांहून अधिक पातळी असलेले काही साधक हिंदु राष्ट्र-जागृती सभा, आंदोलने इत्यादींमधील वाईट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी नामजप करतात. त्यांनी तेवढा वेळ ‘निर्गुण’ हा नामजप करावा.
३. न्यास
समष्टी स्तरावरचे त्रास दूर करण्यासाठी ‘निर्गुण’ हा नामजप जाता-येतांना किंवा बसून करतांना पुढीलप्रमाणे न्यास करावा.
एका हाताचा तळवा अनाहतचक्रावर आणि दुसर्या हाताचा तळवा मणिपूरचक्रावर आडवा धरावा. हाताचा तळवा न्यास करायच्या स्थानापासून १ – २ सें.मी. दूर धरावा. उपायांसाठी नामपट्टी लावलेल्या सहस्रार आणि विशुद्ध या चक्रांवर न्यास केल्यास समष्टी स्तरावरील आक्रमणांपासून सर्व शरिराचे रक्षण होत नाही. अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांवर न्यास केल्यास सर्व शरिराचे रक्षण होते. त्यामुळे अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र यांवर न्यास करावा.’
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ (१३.२.२०२०)