रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ होण्यापूर्वी आणि तो चालू झाल्यावर साधिकेला झालेले त्रास अन् यज्ञसमाप्तीनंतर अनुभवलेली यज्ञाची परिणामकारकता !
यज्ञामुळे वातावरणात देवीच्या मारक शक्तीचे प्रक्षेपण होत होते. त्यामुळे ‘त्रास होत आहे’, असे मला जाणवले. नंतर मी उपायांसाठी यज्ञस्थळी गेले. तेथे बसल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन माझा त्रास हळूहळू न्यून झाला आणि मला शांत वाटू लागले.