पंढरपूर – आषाढ शुक्ल एकादशी सोहळा १७ जुलै या दिवशी होत असून सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पंढरपूर येथे येतात. यात्रेच्या कालावधीत येणार्या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दिंडींच्या मुक्कामासाठी पंढरपूर शहरालगत नवीन ५ ठिकाणी प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे. पंढरपूर रेल्वेचे मैदान, भटुंबरे, गुरसाळे, गोपाळपूर, वाखरी या ठिकाणी दिंडीच्या मुक्कामासाठी निवारा, पिण्याचे आणि वापराचे पाणी, शौचालय, विद्युत् व्यवस्था, आरोग्य सुविधा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ वारकर्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाइंद्रायणीतील प्रदूषण थांबवण्यासाठीही जिल्हाधिकार्यांनी पुढाकार घ्यावा, असे वारकर्यांना वाटते ! |