आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलैला देहूतून प्रस्थान करणार !

संत तुकाराम महाराज

देहू, २६ जून – आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलैला देहूतून प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्याच्या पूर्वी संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात पालखी प्रस्थान सप्ताह चालू आहे. या वर्षी आषाढी वारी सरकारच्या वतीने विशेष वाहनाने पंढरपूर येथे जाणार आहे. १ जुलै या दिवशी पहाटे ५ वाजता महापूजा झाल्यावर सकाळी ९ ते १२ देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि दुपारी २ वाजता ठराविक वारकर्‍यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा प्रस्थान करेल. प्रस्थान सोहळ्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या पादुका मुख्य मंदिरात ठेवण्यात येणार आहेत.