अकोला, १५ जून (वार्ता.) – सरकारने पायी वारी रहित करून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. याचा फेरविचार करून २४ जूनच्या आत ५० वारकर्यांसमवेत पायी वारीची अनुमती द्यावी, अन्यथा सरकारच्या धोरणाप्रमाणे ‘माझी वारी, माझी जबाबदारी’ याप्रमाणे पाऊल उचलावे लागेल, असे प्रतिपादन विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी केले. ‘कोरोनाच्या दृष्टीने चाचणी करून आणि नियमावली सिद्ध करून अनेक वारकरी संघटनांच्या समवेत सर्वानुमते निर्णय घेऊ’, असेही ते म्हणाले.