हडपसर (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद़्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १४ जून या दिवशी हडपसर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. पुणे शहरातील सोहळ्याचा हा अखेरचा टप्पा असल्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या सोहळ्याच्या स्वागतासाठी हडपसर परिसर सज्ज झाला असून प्रशासनाकडून वारकर्यांसाठी विविध सोयीसुविधांचे नियोजन केले जात आहे.
महापालिकेकडून ४ ठिकाणी विसावा ओट्यांची डागडुजी, रंगरंगोटी, मंडप उभारणी, रेलिंग लावणे आदी कामे करण्यात येत आहेत, तसेच आरोग्य विभागाकडून दवाखाने वारकर्यांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुले रहाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पालखी मार्ग साफसफाईसाठी एकूण ८५९ सेवक २४ घंटे कार्यरत असणार आहेत, तसेच पालखीसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.