संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा १२ जूनला पुण्‍यात मुक्‍काम !

संत तुकाराम महाराज पालखी

टाळ-मृदुंगाच्‍या गजरात सहस्र्रो भाविकांच्‍या उपस्‍थितीत देहूत संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीने १० जूनला प्रस्‍थान ठेवले आहे. इनामदार वाड्यातील मुक्‍कामानंतर ११ जूनला ही पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्‍कामासाठी विसावली होती. १२ जूनला पहाटे ५ वाजता पालखी पुणे मुक्‍कामी रवाना होईल. हा सोहळा पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठा आनंद सोहळा असतो. संत तुकाराम महाराजांची पालखी विठ्ठल मंदिरात विसावल्‍यानंतर या सोहळ्‍यातील अन्‍य दिंड्या आणि वैष्‍णवजन हे आपल्‍या दिंडीच्‍या मुक्‍कामाच्‍या ठिकाणी रवाना झाले आहेत.

आकुर्डीतील विठ्ठल-रुक्‍मिणी

आकुर्डीतील विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्‍थानचे मंदिर ४०० वर्षांपूर्वीचे आहे. या ठिकाणी संत तुकोबा महाराज विसावा घ्‍यायचे. नंतर त्‍यांचे पुत्र डोक्यावरून पादुका घेऊन वारी करत होते. तेही आकुर्डीत मुक्‍कामाला थांबायचे. या सोहळ्‍याला ३५० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत.