पनवेल येथे ११ भाविक विजेच्या धक्क्याने घायाळ !

पनवेल – येथे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी ११ भाविक विजेच्या धक्क्याने घायाळ झाले. वडघर खाडी परिसरात विसर्जन घाटावर रात्री ८.३० वाजता हा प्रकार घडला. गर्दीच्या वेळी विजेची तार तुटली आणि ती थेट गणेशभक्तांवरच पडली. त्यामुळे विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील १० जणांचा समावेश आहे. ११ जणांपैकी ४ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ६ जण किरकोळ, तर १ जण गंभीर घायाळ असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत, अशी माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. विसर्जनाच्या वेळी जनरेटरवरून वीजपुरवठा करावयाची वायर मुसळधार पावसामुळे तुटून मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडली. त्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला.