जिहादच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक ! – नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

नीरज अत्री ,अध्यक्ष विवेकानंद कार्य समिती हरियाणा

रामनाथी, २० जून (वार्ता.)  – आपण त्या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्यासाठी हिंदूंनी स्वयंबोध म्हणजे स्वत:चा धर्म समजून घेणे आवश्यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्हणजेच शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक आहे. कुराणमध्ये मुसलमानेतरांसाठी ‘काफिर’ हा शब्द वापरला आहे. काफिरांविरोधात जिहाद करण्याचा संदेशही कुराणामध्ये देण्यात आला आहे.

सौजन्य सुदर्शन news

महाराष्ट्रातील वारी परंपरेमध्ये मुसलमानांनी घुसखोरी केली आहे. वारीमध्ये सहभागी झालेल्या मुसलमानाला विठ्ठलाचा महिमा सांगता आला असता; परंतु त्यांनी ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे’, असे सांगितले. पश्चिम बंगाल, काश्मीर, केरळ यांसारख्या मुसलमान बहुसंख्य असलेल्या ठिकाणी ते हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे प्रकार करत नाहीत. ज्या ठिकाणी ते अल्पसंख्यांक आहेत, तेथे हे असे प्रकार करून जवळीक साधण्याच्या प्रयत्न करतात. त्यामुळे हिंदूंनी प्रथम शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक आहे, असे परखड उद्गार हरियाणा येथील ‘विवेकानंद कार्य समिती’चे अध्यक्ष नीरज अत्री यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.