वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन !

डावीकडून श्री. सतिश कुमार, श्री. अर्जुन संपथ, पुस्‍तक प्रकाशित करतांना कर्नल करतार सिंह मजीठिया आणि श्री. रमेश शिंदे

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये २०.६.२०२३ या दिवशी ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्‍या हस्‍ते ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. हे पुस्‍तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्‍ये ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर विक्रीसाठी उपलब्‍ध असणार आहे. हे पुस्‍तक हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केले आहे. या वेळी व्‍यासपिठावर तमिळनाडू येथील ‘हिंदू मक्‍कल कत्‍छी’ (हिंदु जनतेची आघाडी) या संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘गोरक्षक दला’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री. सतीश कुमार आणि श्री. रमेश शिंदे हे उपस्‍थित होते.