१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
अभिप्राय
श्री. विकाश धाकड, महाकाल युवा समिती, बाराखेडा, गंगासा, मंदसौर, मध्यप्रदेश.
‘रामनाथी आश्रमातील प्रत्येक ठिकाणचे वातावरण शुद्ध आहे. प्रत्येक ठिकाणची शुद्धता आणि व्यवस्था पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.’ (१५.६.२०२३)
सौ. सुषमा विजयसिंह गहेरवार, संस्थापिका, श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड, महाराष्ट्र.
१. रामनाथी आश्रम सकारात्मक ऊर्जा देणारा आहे ! : ‘आमच्या सुदैवानेच आम्हाला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाकडे खेचून आणले. आश्रम पुष्कळ चांगला आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. जे आम्हाला आश्रमापर्यंत घेऊन आले, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि सद़्गुरु चरणी प्रार्थना करते, ‘आम्हाला योग्य दिशा देऊन आमच्याकडूनही चांगले कार्य करून घ्यावे !
२. संगीत आणि संशोधन : संगीताच्या माध्यमातून आम्हाला जी सकारात्मकता मिळते, ती अत्यंत प्रभावी माध्यमांद्वारे पी.पी.टी. (Power Point Presentation)द्वारे सादर करण्यात आली आहे.