‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमंत्रण पत्रिकेतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्‍याला विरोध करण्‍यासाठी सूक्ष्मातील अनिष्‍ट शक्‍तींनी तिच्‍यावर आक्रमण करणे

सौ. मधुरा कर्वे

८.६.२०२३ या दिवशी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिकेचे ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्‍यात आले. तेव्‍हा तिच्‍यामध्‍ये नकारात्‍मक ऊर्जा काहीच नसून १८४२ मीटर सकारात्‍मक ऊर्जा होती. १४.६.२०२३ या दिवशी पत्रिकेवर त्रासदायक स्‍पंदनांचे आवरण आल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे तिचे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे पुन्‍हा संशोधन करण्‍यात आले. तेव्‍हा तिच्‍यामध्‍ये २१८ मीटर नकारात्‍मक ऊर्जा आढळून आली आणि तिच्‍यातील सकारात्‍मक ऊर्जा घटून ती ५३४ मीटर झाली होती.

या निमंत्रण पत्रिकेचे लोलकानेही परीक्षण करण्‍यात आले. तेव्‍हा लक्षात आले की, पत्रिकेवर ज्‍या ठिकाणी ध्‍वजाचे चित्र, तसेच त्‍याच्‍यावरच्‍या भागात ॐ चे चित्र आणि त्‍याच्‍या भोवती पांढरी वलये आहेत, त्‍यांच्‍यावर आवरण आले आहे. यातून ‘अनिष्‍ट शक्‍ती किती हुशारीने निमंत्रण पत्रिकेतील सर्वाधिक सात्त्विकता प्रक्षेपित करणार्‍या चित्रांवर सूक्ष्मातून आक्रमण करून ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला त्‍यांचा विरोध दर्शवत आहेत’, हे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.६.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक