रामनाथ देवस्थान – काही दिवसांपूर्वी बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन त्यात ३०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ३१ मार्च या दिवशी देहलीच्या शाहीनबागमधील एक धर्मांध केरळमध्ये गेला. तेथे त्याने अलपुझा-कन्नूर एक्सप्रेसमध्ये पेट्रोल टाकून प्रवाशांना पेटवून दिले. त्यात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ९ जण गंभीर घायाळ झाले. त्यानंतर २ मासांनी समाजकंटकाने एका रिकाम्या बोगीला आग लावली. त्याच्या बाजूलाच भारत पेट्रोलीयमचे गोदाम होते. तेव्हा मोठी दुर्घटना घडण्यापासून आपण थोडक्यात वाचलो. हे ‘गझवा ए हिंद’ आहे. यालाच ‘जिहाद’ म्हणतात, असे मत संरक्षणतज्ञ आर्.एस्.एन्. सिंह यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पंचम दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले.
या वेळी व्यासपिठावर पंचकुला (हरियाणा) येथील ‘विवेकानंद कार्य समिती’के अध्यक्ष श्री. नीरज अत्री, भुवनेश्वर (ओडिशा) येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक अनिल धीर, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी, ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल आणि मध्यप्रदेश येथील ‘हिंदु सेवा परिषदे’चे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी हे मान्यवर उपस्थित होते.
‘रेल्वे जिहाद आतंकवादाचे नवे रूप’ या विषयावर बोलतांना आर्.एस्.एन्. सिंह म्हणाले की, देहलीच्या शाहीनबागमध्ये केरळहून ‘पीएफ्आय’चे लोक गेले होते, तर दुसरा आरोपी अलपुझा-कन्नूर एक्सप्रेसमध्ये हत्या करण्यासाठी शाहीनबागमधून केरळला गेला होता. पोलीस चौकशीमध्ये आरोपीला स्थानिक साहाय्य मिळाल्याचे म्हटले आहे. केरळमध्ये जिहादची ‘इको सिस्टिम’ (यंत्रणा) आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाला बंगालचा एक जिहादी पकडला गेला. बेंगळुरूमध्ये दरोडे टाकल्याप्रकरणी ४ जिहाद्यांना शिक्षा झाली. त्यांना जिहादसाठी पैसा प्राप्त करण्यासाठी सांगितले गेले होते; म्हणून त्यांनी दरोडे टाकल्याचे समोर आले. अशाच प्रकारे आणखी तिघांना शिक्षा झाली. यालाच ‘गझवा-ए-हिंद’ म्हणतात. जेव्हापासून भारतात ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ रेल्वेगाडी चालू झाली, तेव्हापासून तिच्यावर विविध ठिकाणी दगडफेक करण्यात आली. ओडिशातील बालासोर हे अतिशय संवेदनशील स्थान आहे. त्यामुळेच रेल्वे दुर्घटनेसाठी ते ठिकाण निवडण्यात आले असावे, असे वाटते. सर्व जिहाद्यांची मुळे एकमेकांशी जुळलेली असून त्यांना सीमा नाही.