
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील वेस्ट व्हॅली सिटी शहरातील ‘व्हॅली फेयर मॉल’मध्ये भरदुपारी भारतीय वंशाच्या एका मुसलमान कर्मचार्यावर त्याचा धर्म विचारून एका ख्रिस्ती व्यक्तीने चाकूद्वारे आक्रमण केले. यात घायाळ झाल्याने या कर्मचार्याला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. आरोपीने पोलिसांसमोर मान्य केले की, तो पीडित व्यक्तीच्या मुसलमान धर्मामुळेच त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीचे नाव पीटर मायकल लार्सन (वय ४८ वर्षे) आहे, तर पीडित मुसलमानाचे नाव सय्यद सोहेल उद्दीन आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत लार्सनने उघडपणे मान्य केले की, तो स्वतःला एक ‘कॅटॅलिस्ट’ (उत्प्रेरक) मानतो आणि मुसलमानांना ठार मारणे हाच त्याचा उद्देश होता.
‘युटा इस्लामिक सेंटर’चे इमाम शुऐब दीन यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत युटा राज्यामध्ये मुसलमानांविरुद्ध छळवणूक, धमक्या आणि हिंसाचार यांत मोठी वाढ झाली आहे. आता झालेले आक्रमण राज्याच्या इतिहासात आमच्या समुदायाच्या कोणत्याही सदस्यावर झालेले आतापर्यंतचे सर्वांत भीषण आक्रमण आहे.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !