विधीमंडळाच्या सचिवांकडून शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटीस !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ३९ आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील १४ अशा शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधीमंडळाच्या सचिवांकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ३९ आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील १४ अशा शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधीमंडळाच्या सचिवांकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ३ जुलै या दिवशी शिवसेनेचे विधीमंडळ कार्यालय बंद केले. एकनाथ शिंदे गटाकडून विधीमंडळ सचिवांना याविषयीचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विधानभवनात दुसर्या मजल्यावर असलेले विधीमंडळ पक्ष कार्यालय बंद करण्यात आले.
शिवसेनेत बंडखोरी करून ३९ समर्थक आमदारांसह बाहेर पडलेले शिवसेना पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १ जुलै या दिवशी पक्षनेतेपदावरून काढले आहे.
आम्ही अजूनही शिवसेनेत असून विधीमंडळ पक्ष आमचा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. कुणीही येथे मंत्रीपदाच्या आशेने आलेले नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.
प्रवीण दरेकर आणि मी स्वत: नरहरी झिरवाळ अन् राजेंद्र भागवत यांची भेट घेऊन आसन व्यवस्थेच्या संदर्भात, तसेच आजारी आमदारांच्या वैद्यकीय व्यवस्थेविषयी चर्चा केली. उद्याच्या विश्वासदर्शक ठरावासाठी येथील सुरक्षा व्यवस्था चोख असावी, अशी मागणी केली.
मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. मला बहुमत चाचणीचा खेळ खेळायचा नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच दगा दिला. बंडखोरांना काही कमी न करता त्यांना मोठे करून मी पापाची फळे भोगत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील विश्वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ५३, काँग्रेस ४४ आणि शिवसेनेकडे १६, असे संख्याबळ आहे. महाविकास आघाडी सरकारकडे असलेले हे संख्याबळ पहाता सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले जात आहे.