मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर केवळ २ पर्याय उरले !

त्यागपत्र द्यावे लागणार किंवा बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ५३, काँग्रेस ४४ आणि शिवसेनेकडे १६, असे संख्याबळ आहे. महाविकास आघाडी सरकारकडे असलेले हे संख्याबळ पहाता सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले जात आहे.

त्यामुळे बहुमत चाचणीमुळे सरकार कोसळल्यानंतर होणारा अवमान टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचे आकलन करून त्यागपत्र देणे उचित ठरेल, असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे; पण त्यांनी त्यागपत्र न दिल्यास त्यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.