प्रदूषण नियंत्रण मंडळ सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांवर कारवाई करणार
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठकीत सदस्य सचिवांना न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्याचे अधिकार दिले असून सनबर्नविरुद्ध लगेच खटला प्रविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठकीत सदस्य सचिवांना न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्याचे अधिकार दिले असून सनबर्नविरुद्ध लगेच खटला प्रविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिसांचे इ.डी.एम्.च्या आयोजकांशी साटेलोटे असल्याचे आणि राज्यात ध्वनीप्रदूषण होण्याला पोलीसही उत्तरदायी असल्याचे यातून स्पष्ट होते, असे म्हटल्यास चूक ते काय ?
‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषण होऊनही ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत – उच्च न्यायालय
सनबर्नच्या आयोजकांनी आवाजाच्या पातळीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यक्रमाच्या ठिकाणी बसवावी, तसेच आवाजाची पातळी दर्शवणारे फलक कार्यक्रमाच्या ठिकाणी लावावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने सनबर्नच्या आयोजकांना दिला होता, तरीही…
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचा कोमुनिदादला भूमीचे भाडे वाढवण्याचा आदेश – त्यामुळे पुढील आठवड्यात वागातोर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक कार्यक्रमासाठी भूमीचे नवे वाढीव दर लागू होणार !
देशाची भावी पिढीच व्यसनाच्या आहारी जात असेल, तर भारताला महाशक्ती करण्याचे उद्दिष्ट कधीतरी साध्य होऊ शकते का ? याचा गांभीर्याने विचार या निमित्ताने होणे आवश्यक आहे, तसेच युवकांनीही क्षणिक मोहापायी, नशेच्या आहारी जाऊन अशा निरर्थक महोत्सवांमध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.
सहस्रो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्या कार्यक्रमांचे आयोजन करून प्रशासन काय साध्य करत आहे ? अशा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती न मिळण्यासाठी प्रयत्न करून हा नियोजित कार्यक्रम रहित करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !
गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये.
‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !
‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !