महाविकास आघाडी ५ वर्षे चालेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यशासनातील प्रत्येकजण समर्थपणे दायित्व निभावत असून हे शासन ५ वर्षे चालेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रश्‍न आहेत. त्यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या वेळी ‘देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला सिद्ध आहात का ?’ या दर्डा यांच्या प्रश्‍नावर शरद पवार यांनी वरील उत्तर दिले.

संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्याची मागणी करणार्‍या याचिकाकर्त्याला १ लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्देश !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा दळणवळण बंदी घोषित करण्यात येऊ नये, यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्यासाठीची मागणी अधिवक्ता हर्षल मिराशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

राज्यातील वाड्या, वस्त्या आदींना असणारी जातीवाचक नावे पालटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २ डिसेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. यामुळे आता कुंभारवाडा, तेलीआळी, सुतारवाडी आदी जातीवाचक नावे पालटण्यात येणार आहेत.

राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गोव्यातील आर्चबिशपांचाही विरोध

अनेक प्रकल्पांना विरोध करतांना त्यात चर्चप्रणित संघटनांचा सहभाग असतो आणि ख्रिस्ती समाजाची संख्याही अधिक असते. याचे कारण यातून लक्षात येते. हिंदूंनी यातून शिकावे !

तारकर्ली येथे पर्यटकांची स्थानिकांना मारहाण

पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्ली गावात २ डिसेंबरला रात्री पर्यटकांच्या चारचाकी वाहनाने स्थानिक दुचाकीस्वारास धडक दिली. याविषयी विचारणा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांना चारचाकीतील पर्यटकांनी मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

वीजदेयकांविषयीच्या तक्रारींचे निवारण होत नाही, तोपर्यंत वीजदेयके भरणार नाही ! – भाजपची मोर्च्याद्वारे चेतावणी

वीजदेयकांचा प्रश्‍न गेले अनेक मास वारंवार पुढे येत आहे ! प्रशासन त्यावर तत्परतेने काही तोडगा का काढत नाही ?

(म्हणे) ‘जुने गोवे हा ‘वारसा विभाग’ घोषित करा !’

विजय सरदेसाई जुने गोवे या चर्चच्या परिसराचे संरक्षण करण्याची मागणी करतात, त्याप्रमाणे गोव्यात अनेक प्राचीन मंदिरेही आहेत. त्यांच्या जतनासाठी कृती करण्याची मागणी सरदेसाई का करत नाहीत ?

अर्जुन पुरस्कारप्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने ५ डिसेंरबला पणजी येथे सत्कार

मूळचे सरगवे, दोडामार्ग येथील राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेते सन्माननीय भारतीय सैनिक सुभेदार अजय अनंत सावंत यांचा सन्मान सोहळा  ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे.