१७ लाख १० सहस्त्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधिन
सातारा, १४ मार्च (वार्ता.) – फलटण (जिल्हा सातारा) शहरातील कुरेशीनगर भागात वधासाठी गोवंशियांना आणले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कुरेशीनगर भागात जाऊन वाहने आणि गोवंशीय यांना कह्यात घेतले. या कारवाईमध्ये वाहने आणि गोवंशीय असा १७ लाख १० सहस्त्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.
२ वाहनांमध्ये २१ वासरे, १० रेडे, ५ रेडकू असे गोवंशीय दाटीवाटीने अनधिकृतपणे भरण्यात आले होते. या प्रकरणी महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम ९ (ब), ५ (ब), प्राणी छळ अधिनियम ११ (१) (अ) अन्वये फलटण पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.