गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना केला उद्ध्वस्त !

गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोच्या नेतृत्वाखाली ४८ घंटे अभियान करून हा कारखाना उद्ध्वस्त केला. गडचिरोली पोलिसांची ही सर्वांत मोठी कामगिरी आहे. या अभियानात एक सैनिक घायाळ झाला आहे.

मद्यालये, बार आदींना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देण्यास प्रतिबंध करण्यासाठी कायदा करावा !

‘हे अशासकीय विधेयक सभागृहात चर्चेसाठी घेण्यात यावे’, यावर सभागृहात बहुमताने संमती देण्यात आली. त्यामुळे हे विधेयक पुढील अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे आधुनिक वैद्य बडतर्फ

महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रामध्ये एका आधुनिक वैद्याने ‘पॉझिटिव्ह’ महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आल्याचे संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी सांगितले.

बेळगाव सीमाप्रश्‍नावर केवळ प्रतीवर्षी विधीमंडळात बोलणे, ही तेथील मराठी बांधवांची चेष्टा ! – आमदार जयंत पाटील, शेकाप

बेळगावमधील साडेतीन तालुक्यांचा मराठी भाषिकांचा भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. न्यायालयात आणखी किती दिवस भांडणार ? बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात आला पाहिजे. पूर्वी अधिवेशनाच्या प्रारंभी सीमाप्रश्‍नावर बोलले जात असे.

राजकीय दबाव असता, तर राज्यपालांनी त्यागपत्राला संमती दिली नसती !

जळगाव आणि लोणेरे विद्यापिठांतील कुलगुरूंनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर मुंबई विद्यापिठातून त्यांच्याशी चर्चा करून त्यागपत्राचे कारण समजून घेतले.

‘एल्.ई.डी.’ मासेमारीच्या बंदीसाठी राज्यशासनाने कायदा करावा ! – आमदार रामदास कदम, शिवसेना

‘एल्.ई.डी.’ लाईट समुद्रात सोडून केल्या जाणार्‍या मासेमारीमुळे मोठ्या माशांसह छोटे मासे सरसकट पकडले जातात. यामुळे छोट्या मासेमारांना मासे मिळत नाहीत. त्यामुळे ‘एल्.ई.डी.’ मासेमारीच्या बंदीसाठी राज्यशासनाने कायदा करावा.

वारकर्‍यांच्या मागण्या अधिवेशनात मांडल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार !- ह.भ.प. गणेश महाराज शेटे, अध्यक्ष, विश्‍व वारकरी सेना

वारकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मांडल्या.

मुख्य आरोपी बाळ बोठे पसार घोषित

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पसार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने संमत केला आहे.

१० ते १२ मार्च या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात संचारबंदी !

महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते; मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.

(म्हणे) ‘मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन करणे, हे गंभीर आहे !’

ज्या बाबराने अनेक हिंदूंची हत्या केली, तसेच अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधली, त्या बाबराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करायला हवे, असे अबू आझमी यांना वाटते का ?