मात्र पुणे येथे चाचण्यांसाठी जादा दराने आकारणी !
कोरोना महामारी संकटाच्या काळात नागरिकांना अशाप्रकारे लुबाडणार्या प्रयोगशाळा, रुग्णालये आणि कोरोना सेंटर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकांची नीतिमत्ता ढासळल्याने समाजमूल्यांची पायमल्ली होत आहे. यासाठी लोकांना सामाजिक मूल्ये आचरणात आणण्याचे महत्त्व लक्षात यावे यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

पुणे – राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात केली आहे. आर्.टी.पी.सी.आर्. आणि रॅपिड अँटीजेन चाचणीसाठी अनुक्रमे ५०० रुपये आणि १५० रुपये असा दर निश्चित केला आहे; मात्र पुणे शहरातील काही खासगी प्रयोगशाळा, रुग्णालये आणि कोरोना सेंटरमध्ये नागरिकांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीसाठी ६०० रुपये ते १ सहस्र रुपये तर रॅपिड अँटीजेन चाचणीसाठी १५० रुपये ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत. यावरून राज्य सरकारने आकारलेल्या दरानुसार कार्यवाही होत नसल्याचे आढळून येत आहे.
वेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !