सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथरोगांच्या पार्श्वभूमीवर १०३ गावे जोखीमग्रस्त
भातशेतीच्या हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
भातशेतीच्या हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता ? हाच प्रश्न निर्माण होत आहे. त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला ‘रस्ताबंद’ आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
आरोपी पाटील याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ गुन्हे, कोल्हापूर जिल्ह्यात ९ गुन्हे, गोवा राज्यात ४, कर्नाटक राज्यात २४, असे एकूण ४५ गुन्हे नोंद आहेत. तसेच काही गुन्ह्यांसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते.
पालकांना असा निर्णय घ्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?
राज्यात अनेक डी.एड्. आणि बी.एड्. पदवीधारक बेरोजगार असतांना प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, तसेच नवीन शिक्षक भरती होईपर्यंत या बेरोजगार युवकांना संधी मिळावी.
प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची १२६ कामे एकत्रितपणे का चालू केली नाहीत ? शासकीय निधी आणि वेळ यांचा योग्य उपयोग व्हायला हवा. दुरुस्तीसाठी विलंब का लागला ? – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री
निवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन असतांना २० सहस्र रुपये मानधन देऊन नेमण्यामागील उद्देश काय ? डी.एड्. झालेले बेरोजगार असतांना हा निर्णय का घेतला ?
शासनाला हे का कळत नाही ? या निर्णयामुळे स्थानिक बेरोजगार डी.एड्. उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या बेरोजगारांना शिक्षण सेवेत सामावून घ्यावे, तसेच शिक्षकभरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार चालू आहे.
* देवगड येथील शाळेतील वर्गात पाणी, तर मालवण तालुक्यातील शाळेचे छप्पर कोसळले
* सावंतवाडी-बेळगाव वाहतूक पाऊण घंटा ठप्प
शांत आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनैतिक व्यवसायांत होणारी वाढ ही जिल्ह्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी !