शिवसेनेच्या दोन्ही गटांना म्हणणे सादर करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडून १ मासाचा कालावधी !

शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सद्यस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी आपला गट ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केला आहे.

दीपावलीच्या निमित्ताने राजेश क्षीरसागर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ भेट !

दीपावलीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेला !

भूमी मिळवण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा ‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेल्याचे समजते. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांना रोजगार मिळणार होता.

माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने पुणे येथे निधन !

मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. निम्हण हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षे आमदार होते.

समता पक्षाची मशाल चिन्हासाठीची याचिका फेटाळली !

ठाकरे गटाकडून मशाल हे चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती , मात्र ही याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

चिनी बनावटीचे फटाके विक्रीस आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करणार !- करवीर शिवसेना

आरोग्यासाठी हानीकारक आणि भारतीय अर्थव्यवस्था कुमकुवत करणारे असल्याने चिनी बनावटीचे फटाके व्यापार्‍यांनी विक्रीसाठी ठेवू नयेत. याचसमवेत देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवू नयेत.

‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’, ‘पिझ्झा हट’ या ‘हलाल सर्टिफाईड’ आस्थापनांवर बहिष्काराची मागणी !

हिंदूंनो, भारत ‘हलाल’मुक्त करण्यासाठी देशभरात राबवण्यात येणार्‍या हलालविरोधी चळवळीत सहभागी व्हा !

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवेंसह इतर नेते आणि कार्यकर्ते यांची निर्दोष मुक्तता !

केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईत प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ कोरोना महामारीच्या काळात येथे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत पोलिसांची अनुमती नाकारूनही मोर्चा काढून जाहीर सभा घेतली होती.

भाजप आणि शिंदे गटाने लोकशाहीचा गळा घोटला ! – अरविंद सावंत, खासदार

भाजप आणि शिंदे गटाने लोकशाहीचा गळा घोटला आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी वाशी येथे केले. शिवसेना प्रबोधन यात्रेनिमित्ताने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील शिवसैनिकांच्या मोळाव्यात ते बोलत होते.

ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही !

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तिथे पोटनिवडणुका होणार आहेत. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असून त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.