समता पक्षाची मशाल चिन्हासाठीची याचिका फेटाळली !

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेर ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हावर समता पक्षाने दावा करत देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. याचिकेत ठाकरे गटाकडून मशाल हे चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र ही याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.