- चौथर्यावरील दर्शन १ महिना बंद
- ‘वेंकीज ग्रुप’ करणार नूतनीकरणाचा व्यय !
सोनई (अहिल्यानगर) – शनिशिंगणापूर येथील शनिचौथरा आकर्षक असावा, मोठा असावा या संकल्पनेतून शनिचौथर्याचे नूतनीकरणाच्या कामाच्या वाढीव पायाचे (पहिल्या टप्प्याचे) काम पूर्ण झाले आहे. आता दुसर्या टप्प्याचे काम चालू असल्याने १ महिना चौथर्यावरील शनिदेवाचे चौथर्यावरील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. पूर्वीपासून १८ x १८ आकारामध्ये असलेला चौथरा आता २१ x २१ आकारामध्ये सजवला जाणार आहे. त्यानंतर त्या चौथर्याची २ वेळेस फरशी आणि इतर दुरुस्तीचे काम करण्यात आले. हा चौथरा अधिक आकर्षक असावा, अशी इच्छा ‘वेंकीज ग्रुप’चे कार्यकारी संचालक व्यंकटेश राव यांनी ‘शनैश्वर देवस्थान ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळासमोर व्यक्त केली. त्यास मान्यता मिळाल्यानंतर गोवा राज्यातील स्थापत्य अभियंता अभिजित साधले यांनी सिद्ध केलेल्या आराखड्यानुसार प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला.