कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

पंतप्रधानांच्या विरोधात अपशब्द वापरणे अपमानास्पदच; पण देशद्रोह नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

‘पंतप्रधानांना जोड्याने मारले पाहिजे’ असे अपशब्द उच्चारणे, हे केवळ अपमानास्पदच नाही, तर ती दायित्वशून्यताही आहे. सरकारी धोरणावर विधायक टीका करण्याची अनुमती आहे; परंतु घटनात्मक पदावर असलेल्यांचा अनादर केला जाऊ शकत नाही’ – न्यायमूर्तींचे निरीक्षण

तळेगाव (पुणे) येथील शाळेच्‍या प्राचार्यांना मारहाण !

हे आहे ख्रिस्‍त्‍यांचे खरे स्‍वरूप ! असे प्रकार बहुतांश वेळा इंग्रजी शाळांमध्‍येच उघडकीस येतात. अशा शाळांमधील मुलांवर काय संस्‍कार होत असतील ? पालकांनो, अशा शाळांमध्‍ये मुलांना पाठवायचे कि नाही, ते ठरवा !

मुलींच्या स्वच्छतागृहात ‘सी.सी.टी.व्ही. कॅमेरे’ लावलेल्या आणि ख्रिस्ती प्रार्थना म्हणून घेणार्‍या शाळेच्या प्राचार्यांना मारहाण !

असे प्रकार बहुतांश वेळा इंग्रजी शाळांमध्येच उघडकीस येतात. अशा शाळांमधील मुलांवर काय संस्कार होत असतील ? पालकांनो, अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, ते ठरवा !

गोव्यात अतीवृष्टीमुळे आज शैक्षणिक सुट्टी

राज्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पाणी साचणे, रस्त्याच्या बाजूची माती खचणे, पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात जाणे, झाडांची पडझड होणे, घरांच्या भिंती पडणे आदी घटना घडल्या आहेत. सलग आठव्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत !

आषाढी एकादशीला केवळ बकरी ईदची माहिती देण्याचा शाळेचा प्रयत्न मनसेने हाणून पाडला !

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या मनविसेचे अभिनंदन !

खांडवा (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत बकरी ईदच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून नमाजपठण करवून घेतले !

सण साजरा करणे वेगळे आणि मुलांकडून नमाजपठण करून घेणे वेगळे. ‘मुसलमान विद्यार्थ्यांकडून गीतापठण करून घेतले असते, तर एव्हाना काय झाले असते’, याचा विचार शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने करावा !

अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव !

भारताशी व्यापारवृद्धीसाठी हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन इम्पेक्ट’ आणि ‘एशिया सोसायटी’ या संघटनांच्या १०० लोकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर ठेवला आहे.

बंगालमध्ये सरकारी नोकरीमध्ये बंगाली भाषा येणे अनिवार्य ! – तृणमूल काँग्रेस सरकारचा निर्णय  

राज्य सरकारच्या वतीने चालवल्या जाणार्‍या हिंदी, उर्दू आणि संथाली माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत बंगाली भाषा शिकणे सक्तीची करावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

दहावी आणि बारावी इयत्तेचा निकाल न्‍यून झालेल्‍या शाळांना नोटिसा !

निकालवृद्धी कार्यक्रमाचा ५२ शाळांना लाभ झाला. या शाळांचा निकाल ८० टक्‍क्‍यांपेक्षा न्‍यून लागत असे; मात्र आता त्‍यांचा निकाल सुधारला आहे. जिल्‍ह्यातील ७५ शाळांची गुणवत्ता सुधारण्‍यासाठी निकालवृद्धी कार्यक्रम राबवण्‍यात आला.