कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीकडून टीका

सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारने केलेले संपूर्ण दुर्लक्ष खेदजनक !

बेंगळुरू (कर्नाटक) – विद्यार्थ्यांचे व्यक्तित्त्व विकास, आरोग्य आणि एकाग्रता यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेला योग, तसेच ध्यान शासकीय शाळांमध्ये शिकवण्यात यावे, असे राज्याच्या पूर्वीच्या भाजप सरकारने ठरवले होते. यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्याची कार्यवाही करण्याचा आदेशही काढला होता; मात्र राज्यात आलेल्या काँग्रेस सरकारने शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन १ मास उलटून गेला, तरीही योग आणि ध्यान शाळेत शिकवण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

श्री. मोहन गौडा

याविषयी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी म्हटले की, भाजप सरकारच्या काळात सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारने केलेले संपूर्ण दुर्लक्ष खेदजनक आहे. यावरून काँग्रेस सरकार राजकीय तुष्टीकरणासाठी मुलांच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असून हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?