|
पनवेल – येथील खांदा वसाहतीतील ‘महात्मा स्कूल ऑफ अॅकॅडमिक्स अँड स्पोर्ट्स’ या शाळेत आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे एकाच दिवशी आले असतांनाही केवळ बकरी ईदचीच माहिती देण्यात आली. शाळा प्रशासनाला आषाढी एकादशीचा विसर पडला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खडसावल्यावर शाळा प्रशासनाने लेखी माफी मागितली.
शाळेतील सी.बी.एस्.सी. बोर्डातील विद्यार्थ्यांना ईदच्या निमित्ताने काही इयत्तेतील विद्यार्थ्यांना बोलावून हिजाब घालायला लावणे, कुराण ऐकवणे असे प्रकार करण्यात आले. ‘त्या दिवशी आषाढी एकादशी असूनही दिंडी किंवा सोहळा का आयोजित करण्यात आला नाही ?’ असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला, तसेच ‘धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रकार लगेचच थांबवले नाहीत आणि महाराष्ट्रात हिंदूंचे सण साजरे झाले नाहीत, तर यापुढे होणार्या समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी शाळा प्रशासन उत्तरदायी असेल’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली. या प्रकरणाची नोंद घेत शाळा प्रशासनाने लेखी माफी मागितली असून ‘आषाढी एकादशी साजरी करू’, असे परिपत्रकही काढले.
संपादकीय भूमिका
|