श्रीमती मंगला पुराणिक आणि श्रीमती मंदाकिनी चौधरी यांच्या सत्कार सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन !

श्रीमती मंगला पुराणिक आणि श्रीमती मंदाकिनी चौधरी यांच्या सत्कार सोहळ्यात साधनेत येणाऱ्या चढ-उतारांकडे सकारात्मकतेने पहाणे अन् आनंद मिळवण्यासाठी अडथळ्यांवर मात करणे यांविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये विविध मंदिरे, भजनी मंडळे यांठिकाणी सामूहिक प्रार्थना करून देवाला साकडे घालण्यात येत आहे, तर काही ठिकाणी मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे.

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथील संत वेणास्वामी मठाची स्वच्छता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त मठाची स्वच्छता केल्यावर मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कुपवाड येथील शिवमंदिर येथे स्वच्छता करून तेथे साकडे घालण्यात आले.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

प्रस्तुत सूची वाचून आपल्यापैकी कुणाचा अभ्यास असेल, तसेच आपल्या परिचितांपैकी या विषयांचे जाणकार असतील, तर त्यांनाही या ग्रंथसेवेत सहभागी होण्याविषयी आपण आवाहन करू शकता.

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच काळानुसार साधना आहे ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन !

सोलापूर येथील ‘हिंदु एकता दिंडी’ला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त येथे १५ मे या दिवशी सनातन संस्था आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २१ मंदिरांमध्ये करण्यात आली सामूहिक प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १४ ते १६ एप्रिल या कालावधीत २१ मंदिरांमध्ये सामूहिक साकडे घालण्यात आले.

देहली आणि नोएडा येथे विविध मंदिरांमध्ये करण्यात आली सामूहिक प्रार्थना !

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान आणि सनातन संस्थचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे. देहली आणि नोएडा येथील सामूहिक प्रार्थनेच्या वेळी धर्मप्रेमींसह उपस्थित भाविकांनी सहभाग घेतला.

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे ! – श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज, नंदीपेट, तेलंगाणा

सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नंदीपेट ग्राम येथील श्रीश्रीश्री मंगी रामुलु महाराज यांनी केले.

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सनातन धर्मियांनी रणनीती आखणे आवश्यक ! – रघुनंदन शर्मा, माजी राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष, भारत रक्षा मंच

आज भारतात हिंदु धर्माला राज्यघटनेत कोणतेही विशेष संरक्षण उपलब्ध नाही. भारत हिंदु राष्ट्र असतांनाही राज्यघटनेत त्याला ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) घोषित करण्यात आले, हा हिंदु समाजावर मोठा अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंना प्रवृत्त करणे, हीच काळाची आवश्यकता आहे.