सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी मार्च २०२२ पर्यंत केवळ ३५३ ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली असून अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, संरचना आणि विविध भाषांत भाषांतर करणे इत्यादी ग्रंथनिर्मितीच्या कार्यात आपण हातभार लावू शकता.

१. सनातनच्या आगामी ग्रंथांचे काही विषय

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या संभाव्य ५ सहस्र ग्रंथांपैकी एकूण १ सहस्र ८२३ ग्रंथसंख्येच्या (४९ ग्रंथमालिकांच्या) विषयांची सूची १७.४.२०२२ या दिवशी प्रकाशित करण्यात आली होती. आज त्यापुढील एकूण १ सहस्र ५२२ ग्रंथसंख्येच्या (४६ ग्रंथमालिकांच्या) विषयांची सूची या पृष्ठाच्या खालील भागात प्रकाशित करण्यात आली आहे. उर्वरित सूची पुढील रविवारी १.५.२०२२ या दिवशी प्रकाशित करण्यात येणार आहे. या सर्व विषयांचे लिखाण संगणकीय स्वरूपात सिद्ध आहे.

प्रस्तुत सूची वाचून आपल्यापैकी कुणाचा एखाद्या किंवा काही विषयांच्या संदर्भात अभ्यास असेल, तर अशा ग्रंथांच्या प्राथमिक संकलनासाठी आपण निश्चित वेळ देऊ शकता, तसेच आपल्या परिचितांपैकी या विषयांचे जाणकार असतील, तर त्यांनाही या ग्रंथसेवेत सहभागी होण्याविषयी आपण आवाहन करू शकता.

भावी युद्धकाळाच्या पूर्वी या सर्व ग्रंथांचे प्राथमिक संकलन झाले, तर युद्धकाळानंतरच्या भावी पिढीला या ग्रंथांचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल.

पू. संदीप आळशी

२. ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा

२ अ. मराठी भाषेतील ग्रंथांचे संकलन करणे : संगणकावर टंकलेखन करता येणे, तसेच मराठीचे व्याकरण आणि शब्दरचना यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

२ अ १. विविध सेवा

अ. ज्या विषयावरील ग्रंथ करणार, त्या विषयाच्या विविध सूत्रांच्या मथळ्यांवरून विषयाची अनुक्रमणिका सिद्ध करणे.

आ. अनुक्रमणिकेनुसार लिखाण लावून त्या लिखाणाचे अंतिम संकलन करणे.

इ. सर्वसाधारणपणे १०० पृष्ठांचा (५०० केबीचा) एक ग्रंथ होतो. लिखाणावरून ‘ग्रंथांची किती पृष्ठे होतात’, हे पहाणे आणि पृष्ठसंख्येचा अंदाज घेऊन ग्रंथाचे २, ३, … अशा भागांमध्ये विभाजन करणे.

२ आ. लिखाणातील संस्कृत वचने, श्लोक आदी पडताळणे आणि त्यांचा मूळ संदर्भ लिहिणे : यासाठी साधकाला संस्कृत भाषेचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे.

२ इ. विविध भाषांतील ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची संगणकीय संरचना करणे, तसेच ग्रंथांत छापण्यासाठी सारण्या (टेबल) सिद्ध करणे : यासाठी ‘इन-डिझाईन’ या संगणकीय प्रणालीचे ज्ञान असावे.

२ ई. मराठी, हिंदी, कन्नड किंवा इंग्रजी भाषांतील ग्रंथांचे अन्य देशी-विदेशी भाषांत भाषांतर करणे : मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांत ग्रंथ उपलब्ध आहेत. ही सेवा करण्यासाठी ‘वरील एका भाषेतून आपण ज्या भाषेत भाषांतर करू इच्छिता’, त्या भाषेचे व्याकरणदृष्ट्या उचित ज्ञान असणे आवश्यक आहे. भाषेचे ज्ञान असेल; परंतु व्याकरणदृष्ट्या विशेष ज्ञान नसेल, तर त्यासंदर्भात प्रशिक्षण घ्यावे लागेल. संगणकीय ज्ञान (मराठीतील लिखाणाचे इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याच्या सेवेसाठी MsWord आणि PDF या प्रणालींचे ज्ञान हवे.)

३. ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करा !

वरील सर्व सेवांसाठी संगणकाचे जुजबी ज्ञान असणे, तसेच संगणकीय टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. वर उल्लेखिलेल्या सेवा सनातनच्या आश्रमात राहून किंवा घरी राहूनही करता येतील. ग्रंथ-निर्मितीशी संबंधित सेवा शिकण्यासाठी इच्छुकांना सनातनच्या आश्रमात २-३ आठवडे रहाता येईल. पुढे आश्रमात राहून किंवा घरी राहूनही सेवा करता येतील.

– (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, गोवा. (१७.४.२०२२)

३ अ. सेवा करू इच्छिणाऱ्यांनी कळवायची माहिती

या सेवा करू इच्छिणाऱ्यांनी वरील सारणीनुसार आपली माहिती सनातनच्या साधकांना कळवावी आणि साधकांनी ती माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१


(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)