असे आहेत आमचे साधेभोळे पू. उमेशअण्‍णा ।

निरपेक्ष राहूनी सेवा अन् साधना करती ।
अखंड प्रयत्न अनुसंधानात रहाण्‍यासाठी ॥
नसे अहंची बाधा, नसे आसक्‍ती त्‍यांना ।
असे आहेत आमचे साधेभोळे ‘पू. उमेशअण्‍णा’ ॥

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर साधिकेचा कंबरदुखीचा त्रास न्‍यून होणे

मला कंबरदुखीचा तीव्र त्रास चालू झाला.त्‍यानंतर मी मला होत असलेल्‍या त्रासाविषयी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्‍हा त्‍यांनी मला प्रतिदिन २ घंटे नामजप करायला सांगितला.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी स्‍वतः वापरलेली कापडाची लहान वळकटी साधिकेला वापरण्‍यास दिल्‍यावर तिला आलेल्‍या अनुभूती !

‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मणक्‍याचा त्रास दूर होण्‍यासाठी स्‍वतः वापरलेली कापडाची लहान वळकटी मला वापरण्‍यासाठी दिली. त्‍यानंतर आलेल्‍या अनुभूती दिल्‍या आहेत. 

नाशिक येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

‘सगळीकडे देव आहे’, असे पू. आजी सांगत असत. पू.आजी सदैव देवाच्या अनुसंधानात असत. त्यांच्या हातात कायम जपमाळ असे.सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा होती.

‘साधना केली (देवाचे केले) आणि हानी झाली (नुकसान झाले)’, असे जगात एकतरी उदाहरण आहे का ?

‘आपल्या जन्माचा उद्देश ‘प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि आनंदप्राप्ती (ईश्‍वरप्राप्ती) करणे’ हा आहे. याचा आज मानवाला पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळे ‘साधना करणे, म्हणजे जीवन वाया घालवणे’, असे त्यांना वाटते. याविषयी पूर्णवेळ साधकाचे अनुभव ऐकून ‘गुरु आणि ईश्‍वर अशा साधकांची कशी काळजी घेतात ? आणि त्याला सर्वोच्च
सुख, म्हणजेच आनंद कसा प्राप्त करून देतात ?’, हे शिकता येईल.

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्‍या प्रथम वर्ष श्राद्धविधीच्‍या वेळी त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना जाणवलेली सूत्रे

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा प्रथम वर्ष श्राद्धविधी ४.७.२०२३ आणि ५.७.२०२३ या दोन दिवशी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात करण्‍यात आला. त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना त्‍या विधींच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्‍या साधनेत ‘अंतर्मुखता’ या गुणाचे महत्त्व आणि ‘ती कशी साधावी ?’ याविषयी सनातनचे संत पू. उमेश शेणै यांनी केलेले विवेचन

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍यास असणारे सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांनी ‘अंतर्मुखता म्‍हणजे काय ?, ती नसल्‍यास होणारी हानी आणि ‘साधनेत अंतर्मुखतेचे महत्त्व किती अधिक आहे’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांशी सहजतेने संवाद साधून त्‍यांना घडवणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे !

भाद्रपद शुक्‍ल षष्‍ठी (२१.९.२०२३) या दिवशी सनातनच्‍या देवद, पनवेल येथील आश्रमात रहाणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त आश्रमात रहाणार्‍या कु. दीपाली माळी यांना सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सद़्‍गुरुराया, अशीच असीम गुरुकृपा असू द्यावी आम्‍हावरी ।

सद़्‍गुरु शक्‍तीरूपी चैतन्‍याचा हिमालय असेे देवद आश्रमी ।
साधकरूपी सुंदर सुगंधी फुले उमलली सनातनच्‍या वनी ॥ १ ॥