‘२८.१.२०२३ या दिवसापासून मला कंबरदुखीचा तीव्र त्रास चालू झाला. त्यानंतर ‘एम्.आर्.आय.’ (टीप) केल्यावर मणक्यातील L4 आणि L5 या भागात काही प्रमाणात अंतर (गॅप) आहे’, असे आधुनिक वैद्यांनी अहवाल पाहून सांगितले. त्यांनी औषधे देऊन मला विश्रांती घेण्यास सांगितले. औषधे घेतल्यावर मला तात्पुरते बरे वाटले.
टीप – ‘एम्.आर्.आय. (Magnetic Resonance Imaging)’ : हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.
त्यानंतर मी मला होत असलेल्या त्रासाविषयी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । श्री हनुमते नमः ।’, हा नामजप प्रतिदिन २ घंटे करायला सांगितला. हा नामजप चालू केल्यावर माझ्या कमरेच्या आजूबाजूला होत असलेल्या वेदनांचे प्रमाण न्यून झाले. केवळ L4 आणि L5 या भागात जेथे अंतर (गॅप) आहे, तिथे काही प्रमाणात मला वेदना जाणवत होत्या.
१३.३.२०२३ या दिवशी सद़्गुरु गाडगीळकाका यांनी आधीच्या नामजपाच्या समवेत मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप अर्धा ते एक घंटा करण्यास सांगितला. त्याप्रमाणे नामजप केल्यानंतर मला होणार्या वेदनांची तीव्रता न्यून झाली. केवळ अधिक वेळ बसून सेवा केल्यास मला त्रास जाणवत असे.
अनुभूती
काही वेळा नामजप करत असतांना मला सद़्गुरु मुकुल गाडगीळकाका यांचे तेजस्वी रूप दिसत असे. ‘नामजप झाल्यावर शरीर पुष्कळ हलके झाले आहे’, असे मला जाणवायचे.
‘परात्पर गुरु डॉक्टर, मला ‘आपत्काळात वैद्यकीय साहाय्य मिळाले नाही, तरी नामजपानेही बरे वाटू शकते’, याची प्रचीती आली’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |