असे आहेत आमचे साधेभोळे पू. उमेशअण्‍णा ।

पू. उमेश शेणै

ज्‍येष्‍ठ अमावास्‍या (१८.६.२०२३) या दिवशी सनातन आश्रम, देवद, पनवेल येथे वास्‍तव्‍यास असलेले सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (पू. उमेशअण्‍णा) यांचा ७४ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी पू. उमेश शेणै यांचे कवितेतून केलेले गुणवर्णन पुढे दिले आहे.

(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

कर्नाटक असे जन्‍मभूमी ।
महाराष्‍ट्र त्‍यांची कर्मभूमी ॥ १ ॥

भिन्‍न आहार, भिन्‍न संस्‍कृती ।
स्‍वीकारली त्‍यांनी साधना म्‍हणूनी ॥ २ ॥

वागण्‍यात नम्रता अन् बोलण्‍यात प्रीती ।
सदैव तत्‍पर असती, करण्‍या नामजप समष्‍टी (टीप १) ॥ ३ ॥

लेख लिहिती साधकांना प्रेरणा देण्‍यासाठी ।
अन् गुरुदेवांच्‍या आज्ञापालनासाठी ॥ ४ ॥

निरपेक्ष राहूनी सेवा अन् साधना करती ।
अखंड प्रयत्न अनुसंधानात रहाण्‍यासाठी ॥ ५ ॥

नसे अहंची बाधा, नसे आसक्‍ती त्‍यांना ।
असे आहेत आमचे साधेभोळे ‘पू. उमेशअण्‍णा’ ॥ ६ ॥

टीप १ : पू. उमेश शेणै समष्‍टीसाठी (साधकांसाठी, तसेच धर्मकार्य निर्विघ्‍नपणे पार पडण्‍यासाठी) नामजप करतात.

 – सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक