दैनिक ‘सनातन प्रभात’चा २३ वा वर्धापनदिन उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात साजरा !

वर्धापनदिनाच्या निमित्ताने अनेक वाचक आणि हितचिंतक यांच्या भरभरून शुभेच्छा आणि चैतन्यमय आश्रमभेट !

जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या संदर्भात श्री. धनंजय हर्षे यांना सुचलेली सूत्रे आणि त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर त्यांना आलेले चांगले अनुभव

‘आपण समाजात जिज्ञासूंना संपर्क करतो. ‘संपर्काला जातांना जिज्ञासूंच्या प्रतिक्रियांचा अभ्यास कसा करावा ?’, हे देवाने मला शिकवले. प्रतिक्रियांचा अभ्यास का करायला हवा ?, तर प्रतिक्रियांवरून मनाचा वेध घेता येतो.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ‘सनातन प्रभात’चे कार्यालय असलेल्या चैतन्यमय वास्तूत लावलेल्या माहिती फलकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले आश्‍चर्यकारक पालट !

‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक, तसचे आश्रमात वास्तव्यास असणारे आणि आश्रमात काही कालावधीसाठी येणारे संत अन् साधक यांना आश्रमात आल्यावर चैतन्याच्या स्तरावरील अनुभूती येत आहेत.

‘महाराष्ट्र केसरी’चा योग्य सन्मान हवा !

अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?

मद्याची दुकाने आणि बार यांना देवतांची नावे देण्यास बंदी !

मद्याची दुकाने आणि बार यांना देण्यात येणारी हिंदूंच्या देवतांची नावे हटवण्यात यावीत, यासाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रयत्नशील होती. यासाठी समितीने निवेदने देणे, जागृती करणे यांसारखे उपक्रम राबवले. या निर्णयामुळे समितीच्या या मोहिमेला यश मिळाले आहे, असेच म्हणावे लागेल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कोल्हापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम राजाभाई सवसाणी-पटेल (वय ७० वर्षे) !

कोल्हापूर येथील धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम सवसाणी-पटेल यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे घोषित करण्यात आले. त्यानिमित्त श्री. सवसाणी-पटेलकाका यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वाविषयी अतिशय स्पष्ट विचार मांडले जातात ! – पू. भास्करगिरि महाराज, मठाधिपती, दत्त देवस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिनांक १२ आणि १३ मार्च या दिवशी नगर जिल्ह्यातील देवगड येथे नगर, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ विषयीची संतवाणी !

परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरप्राप्ती, संस्कार आणि अध्यात्म या मार्गाने हिंदूंना हिंदु राष्ट्रापर्यंत घेऊन जात आहेत. यामध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रवास खडतर आहे, तरीही कुठेही न डगमगता दैनिकाचा प्रवास चालू आहे. प्रत्येक हिंदूच्या घरात हे दैनिक गेले पाहिजे, तरच धर्मजागृती व्यवस्थित होईल !

आपत्काळातील दीपस्तंभरूपी मार्गदर्शक सनातन प्रभात !

तिसरे महायुद्ध, उंबरठ्यावर आलेला आपत्काळ यांच्या कालावधीत समाजरक्षणाच्या कार्यात मोठी भूमिका ‘सनातन प्रभात’ समूह पार पाडील. अशा घटनांकडे ‘टी.आर्.पी.’ वाढवण्याच्या उथळ दृष्टीकोनातून न पहाता प्रगल्भ आणि कृतीशील पत्रकारितेचे दर्शन समाजाला घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सण-उत्सव यांविषयीची माहिती शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांना सांगणारे श्री. संतोष वर्तक !

‘‘हे दैनिक राष्ट्र, धर्म, देवता यांविषयीच्या माहितीचे ज्ञानभांडार आहे. यातील वृत्ते वस्तूनिष्ठ असतात. अभ्यासक्रमात शिकवले न जाणारे राष्ट्र-धर्म विषयीचे मार्गदर्शन यातून मिळते. आजच्या पिढीत राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम जागृतीचे कार्य दैनिक करत आहे.’’