‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’मुळे घराघरात हिंदुत्वाची मशाल, ढाल आता सिद्ध होईल !

‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’ची प्रणाली पुष्कळ सुंदर असून प्रत्येक लेख आणि बातमी ‘झूम’ (मोठ्या आकारात पहाणे) करून स्वतंत्र उघडता येते. त्यामुळे बातमी किंवा लेख व्यवस्थित दिसते.

‘ई-पेपर’मुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ आता घराघरात पोचेल, तसेच हिंदुत्वाच्या विचारांची मशाल आणि ढाल प्रत्येक घरात आता सिद्ध होईल. साधनेचे संस्कार, क्षात्रतेज आणि ब्राह्मतेजाने भारित झालेले हे सुविचार आता ‘ई-पेपर’मधील ‘झूम कटींग’च्या माध्यमातून ‘व्हॉट्सॲप’ आणि अन्य सामाजिक माध्यमांद्वारे उत्स्फूर्तपणे अन् नेमकेपणाने ‘शेअर’ (प्रसारित) करता येईल. ‘ई-पेपर’ उपलब्ध केल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

– अक्षय नागेश पांडे (वय २४ वर्षे), यवतमाळ