समाजवाद्यांचा (अपना) बाजार आणि त्यामुळे त्यांची झालेली हानी !

सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्रात सतत सुधारणा अन् पुनरुज्जीवन होत असते. ‘आपला विचार त्याला अपवाद आहे’, असा समाजवाद्यांना अपसमज असावा.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून साधू-संतांचा ‘चिलिमजीवी’ असा संतापजनक उल्लेख !

हिंदूंच्या साधूसंतांचा असा अवमान केल्याच्या प्रकरणी अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक करायला हवी होती !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा माहिरा खान यांना गोतस्करीच्या प्रकरणी ७ वर्षांनी अटक !

गोहत्येचे समर्थन करणारे काँग्रेसमधील धर्मांध नेते गोहत्या आणि गोतस्करीच करणार, यात आश्‍चर्य ते काय ? अशा काँग्रेसला हिंदूंनी निवडणुकीत धडा शिकवूनही जाग आलेली नाही, त्यामुळे तिला राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य !

(म्हणे) ‘महंमद अली जीना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते !’ – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

मुसलमानांच्या मतांसाठी देशाच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असलेल्या जिनांचा असा उदोउदो करणार्‍या अखिलेश यादव यांना सरकारने कारागृहात टाकून त्यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे !

(म्हणे) ‘हिंदूंनो, मर्यादेत रहा, अखिलेश यादवला (निवडून) येऊ द्या, सर्व आत (कारागृहात) जाल !’

‘तुमच्या स्त्रिया आमच्या ‘हरम’चा (जनानखान्याचा) भाग होत्या, दासी होत्या !’, असेही आक्षेपार्ह आणि वासनांध विधान !

उत्तरप्रदेश पोलिसांच्या मारहाणीमध्ये व्यावसायिकाचा मृत्यू

कायद्याच्या नावाखाली एखाद्याला मारहाण करून त्याला ठार करणे, हा गुंडांपेक्षा अधिक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे अशा पोलिसांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे गूढ कायम

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ –  मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सत्ताधारी भाजपच्या व्यतिरिक्त कुणीच जाहीररित्या विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या ! विरोध न करणारे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी उद्या भारतात ‘तालिबानी राजवट’ येण्यासाठी धर्मांधांना साहाय्य केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘ तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते ! –  समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

भारतातील एकाही इस्लामी संघटनेने किंवा इस्लामी नेत्याने तालिबानचा विरोध केला नाही, हे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाव यांची टिमकी वाजवणारे लक्षात घेतील का ? कि त्यांचेही तालिबानला समर्थन आहे ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. सय्यद तुफैल हसन संपूर्ण राष्ट्रगीत बोलू शकले नाही !

हसन यांचे भारतावर किती प्रेम आहे, याचा शोध घ्यायला हवा; कारण खरा भारतीय अशा प्रकारे राष्ट्रगीत विसरणार नाही किंवा तो पाठ करून, कागदावर लिहून तरी आणेल !