
मुंबई – भारतीय नौदलाने ‘मालवण’ युद्धनौकेचे नवीन बोधचिन्ह (क्रेस्ट) प्रसारित केले आहे, ज्यामध्ये ‘वाघ नख’ दर्शवण्यात आले आहे. नौदलाच्या माहितीनुसार ‘वाघ नख’ हे साहस, चपळाता आणि निडरता यांचे प्रतीक आहे. हे बोधचिन्ह भारताच्या सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी सदैव सतर्क रहाण्याचा आणि आवश्यकता भासल्यास शत्रूवर गुप्तपणे अन् अचूक वार करण्याच युद्धनौकेचा संकल्पही दर्शवते.
‘वाघ नखा’लाच का बनवले प्रतीक?
भारतीय नौदलाने स्पष्ट केले की, ‘क्रेस्ट’मध्ये समाविष्ट केलेले ‘वाघ नख’ हे केवळ एक ऐतिहासिक प्रतीक नाही, तर ते शौर्य, धोरणात्मक कौशल्य, सतर्कता आणि आक्रमक क्षमता यांचेही प्रतिनिधित्व करते. हे युद्धनौकेच्या त्या मूल्यांना अधोरेखित करते, ज्यांच्या आधारावर ती कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी नेहमी सज्ज असेल. हा पालट संपूर्ण भारतीय नौदलाच्या अधिकृत ध्वजात किंवा क्रेस्टामध्ये झालेला नाही. हे केवळ ‘आयएन्एस् (इंडियन नेव्हल शिप) मालवण’ची विशिष्ट ओळख आणि तिची कार्यप्रणाली दर्शवणारे नवीन बोधचिन्ह आहे.
वर्ष २०२२ मध्ये प्रसारित करण्यात आला होता नौदलाचा नवीन ध्वज !
यापूर्वी वर्ष २०२२ मध्ये भारतीय नौदलाने स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘आयएन्एस् विक्रांत’ जलावतरणाच्या सोहळ्यात भारतीय नौदलाचा नवीन ध्वज प्रसारित केला होता. ब्रिटीशकालीन ‘सेंट जॉर्ज क्रॉस’ (लाल क्रॉस) हटवून त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरित अशा निळ्या-सोनेरी अष्टकोनी प्रतीकाचा समावेश करण्यात आला.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !