शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !

मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – राज्यशासनाकडून घेतल्या जाणार्‍या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी अभ्यास करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १७ जुलै या दिवशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या विभागातील अधिकार्‍यांचा समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालक यांचाही या समितीमध्ये समावेश आहे. समितीने २ महिन्यांत अहवाल सादर करावयाचा आहे.