उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे – राज्यातील सर्वच महाविद्यालयांना त्यांच्या प्रवेश शुल्काची सविस्तर माहिती दर्शनी भागातील सूचना फलकावर लावणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये, असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व महाविद्यालयांना दिले आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या वेळी पालक आणि विद्यार्थी यांची आर्थिक हानी होऊ नये, हा या निर्णयामागील हेतू आहे.१. प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतांना विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार आणि मान्यतेनुसार ठरवलेले प्रवेश शुल्क भरावे.
२. महाविद्यालयांनी प्रवेश शुल्काची माहिती सूचना फलक आणि माहिती पुस्तिकेत दिलेली आहे किंवा नाही याची निश्चिती करण्याचे दायित्व संबंधित विद्यापीठ अन् विभागीय सहसंचालक यांची राहील.
३. महाविद्यालयांकडून आवश्यक ती कार्यवाही होत नसल्यास महाविद्यालयांचे वेतन थांबवण्याचेही निर्देश विभागीय सहसंचालकांना दिले आहेत.
४. राज्यातील एकूण १ सहस्र २३९ अनुदानित महाविद्यालयांपैकी १ सहस्र २२७ महाविद्यालयांनी दर्शनी भागात शुल्काचे फलक लावलेले आहेत.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !