पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !

ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न !

ए आय निर्मित चित्र

पुणे – जिल्ह्याला लाभलेला समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर आणण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील पारंपरिक स्थळांसह नव्याने विकसित झालेल्या निसर्गरम्य, साहसी, ग्रामीण आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्थळांची प्रसिद्धी करण्यासाठी नागरिक, अभ्यासक अन् पर्यटनप्रेमींना त्यांच्याकडील माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी पाठवायची आहे माहिती !

माहितीचे स्वरूप – जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात स्थळांची ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक माहिती, संदर्भ, वैशिष्ट्ये, तेथे पोचण्याचे मार्ग, उपलब्ध सुविधा, स्थानिक संस्कृती, छायाचित्रे आणि नकाशे
संपर्क माध्यम – ही माहिती [email protected] या ई-मेलवर किंवा ९५११८७४००८ / ८२७५३८७०३२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी.