समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

४ वर्षांपूर्वी विद्वेषी विधाने केल्याचे प्रकरण

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान

रामपूर (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाने नेते आझम खान यांना द्वेषपूर्ण विधाने केल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. १८ एप्रिल २०१९ या दिवशी राज्यातील धमारा गावातील सभेमध्ये बोलतांना त्यांनी घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. या विधानांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

४ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याच्या प्रकरणी आता शिक्षा होणे, ही स्थिती पालटणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली, तर त्याचे गांभीर्य अधिक रहाते !