अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !

ठाणे – अग्नीसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांविरोधात भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने कठोर कारवाई चालू केली आहे. आयुक्त अनमोल सागर यांच्या निर्देशानुसार झालेल्या पडताळणीत अग्नीसुरक्षा यंत्रणा आणि अग्नीशमन विभाग यांचा ना-हरकत दाखला नसल्याचे आढळल्याने संबंधित आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या.

कल्याण रस्त्यावरील नारायण भोईर कंपाऊंड येथे अग्नीशमन विभाग, कुंभारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आणि टोरंट पॉवर यांच्या संयुक्त पथकाने ‘मेसर्स एक्सेल इलेक्ट्रोकेम टेक्नॉलॉजी’ आणि ‘मेसर्स क्रेस्कोनंट इंडिया प्रा.लि.’ या २ औद्योगिक आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित करून ती कुलुपबंद (सील) केली आहेत.