लक्ष्मणपुरी – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने पाठ्यपुस्तकातून मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचे मुसलमान आमदार यांनी टीका केली आहे. ‘मोगलांनी ताजमहाल, लालकिल्ला आणि कुतूबमीनार यांचे बांधकाम केले. (या तिन्ही वास्तू हिंदूंच्या आहेत. याचे उत्खनन केले, तर सत्य समोर येऊ शकते ! – संपादक) मोगलांचा इतिहास पूर्ण जगात शिकवला जातो. सरकारने मोगलांचा इतिहास पुसण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो पुसला जाणार नाही. मोगलांनी भारतावर अधिक काळ राज्य केले आहे. मोगलांनी भारतियांचा पैसा भारताच्या विकासासाठी वापरला. (मोगलांनी हिंदूंना लुटले आणि त्यांच्यावर अत्याचार केले, हेच सत्य आहे. हाच इतिहास आहे आणि त्याविषयी कागदपत्रे उपलब्ध आहेत ! – संपादक) लालकिल्ला आणि कुतूबमीनार यांची नावे पालटून इतिहास पालटला जाऊ शकत नाही. भारत कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही’, असे ते म्हणाले.
‘भारत कभी हिन्दू राष्ट्र नहीं हो सकता’: NCERT ने हटाए मुगलों के चैप्टर तो भड़के सपा MLA इकबाल महमूद, कहा – ताजमहल, लाल किला और क़ुतुब मीनार मुगलों की ही देन#NCERT #Mughalshttps://t.co/0nXv7IzMsS
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 3, 2023
संपादकीय भूमिकामहमूद यांच्यासारख्या धर्मांध राजकारण्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ नये’, यासाठी कितीही जोर लावला, तरी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, हे त्यांनी जाणावे ! |