
मुंबई – महाराष्ट्रात अलीकडील अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी मतदार सूचींच्या सर्वेक्षणासाठी मुदतवाढीची केलेली विनंती भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यानुसार राज्यातील मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (‘एस्.आय.आर्.’च्या) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या माध्यमातून गृहभेटीची मोहीम ३० जून ते ८ ऑगस्ट, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
१७ ऑगस्ट २०२६ या दिवशी प्रारूप मतदार सूची प्रसिद्ध केली जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात येतील. १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडेल. १९ ऑक्टोबर २०२६ या दिवशी अंतिम मतदार सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !