
पुणे – यावर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ३ दिवस दिलेल्या आरोग्य सेवेचा लाभ वारीतील ५३ सहस्र ८१३ वारकर्यांनी घेतला. महापालिकेची प्रसुतीगृहे, दवाखाने, आयुष्मान आरोग्य मंदिरे, ३५ वैद्यकीय पथके आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्य केंद्रा’वर आरोग्य पडताळणी, वजन, उंची आणि रक्तदाब पडताळणी करण्यात आली, तसेच रक्त, थुंकी (क्षयरोग), मलेरिया आणि मधुमेह यांसह विविध चाचण्या विनामूल्य करण्यात आल्या. वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या २१ वारकर्यांना रुग्णवाहिकेद्वारे कमला नेहरू रूग्णालयात भरती करण्यात आले. १ सहस्र २२४ वारकर्यांनी ‘फिजिओथेरपी सेवे’चा लाभ घेतला. पालखी मुक्काम स्थळी २५० मेडिकल किटचे वितरण करण्यात आले. १० सहस्र महिला वारकर्यांना ‘सॅनिटरी पॅड’चे वितरण करण्यात आले. भवानी पेठ, नाना पेठ येथे २४ घंटे वैद्यकीय सेवा उपलब्ध होती. पुणे ते पंढरपूर मार्गावर ४ स्वतंत्र वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका कार्यरत रहाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख आधुनिक वैद्य नीना बोराडे यांनी दिली.
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !