Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक

अमेरिकेच्या अन्वेषण यंत्रणेने साडेतीन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी घेतले होते नाव

पोलीस निरीक्षक गुरिंदरजीत सिंह नागरा

चंडीगड – पंजाब पोलिसांनी गुरिंदरजीत सिंह नागरा या त्यांच्याच पोलीस निरीक्षकाला ३ कोटी ४० लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक केली. अमेरिकी अन्वेषण यंत्रणा एफ्.बी.आय.ने (‘फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन’ – सांघिक अन्वेषण यंत्रणा) या प्रकरणात त्यांचे नाव घेतले होते.

एफ्.बी.आय.ने म्हटले होते की, पोलीस निरीक्षक गुरिंदरजीत सिंह नागरा एका आंतरराष्ट्रीय खंडणी टोळीशी जोडलेले होते. ते गुंड जग्गू भगवानपुरिया आणि इतर गुन्हेगारांसह मिळून अमेरिकेत रहाणार्‍या भारतीय वंशाच्या कुटुंबांना लक्ष्य करण्याच्या कटात सहभागी होते. याद्वारे अमेरिकेत रहाणार्‍या लोकांना धमक्या देऊन त्यांच्याकडून अनुमाने ४ लाख डॉलर्सची (३ कोटी ४० लाख रुपयांची) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संपूर्ण जाळ्यामध्ये गुंडांसमवेतच काही स्थानिक साथीदारांचीही भूमिका होती, ज्यामध्ये नागरा यांच्या नावाचाही समावेश होता.

या माहितीनंतर पंजाब  पोलिसांनी नांगरा यांचे स्थानांतर केले आणि विभागीय चौकशी चालू केली. या चौकशीनंतर नागरा यांना अटक करण्यात

संपादकीय भूमिका

हा कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे. अशांच्या या कृत्यांचा त्यांच्या वरिष्ठांना सुगावा कसा लागत नाही ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !